shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुळवेल च्या काढ्याने खारे कर्जुने गाव झालं करोना मुक्त:- प्रा बाळासाहेब निमसे..!

गुळवेल च्या काढ्याने खारे कर्जुने गाव झालं करोना मुक्त :- प्रा बाळासाहेब निमसे
नगर:  गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण जग करोना या महामारीने त्रस्त झाले असताना आता भारतात सुद्धा गावागावात करोना आपले मूळ पसरवत आहे.अशा या भीतीदायक वातावरणात या रोगावर औषध नाही आणि लस ही नाही, पण या करोना रोगाशी लढण्याचे खरे काम केले गुळवेलच्या काढ्याने आज संपूर्ण भारतात प पु स्वामी रामदेवजी महाराज व इतरांनी गुळवेलचे महत्व सांगितल्यापासून अनेक लोक गुळवेलचा काढा पिऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवत आहे.

 
असेच आमचं गाव खारे कर्जुन तालुका नगर यापूर्वी गावातील लोकांना गुळवेलचे महत्व सांगितले जायचे. पण लोक एवढे गंभीरपणे घेत नव्हते. गावात पहिला एक रुग्ण करोना बाधित सापडला. संपूर्ण गाव घाबरलं त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्ट झाली. सुदैवाने कोणालाही त्याची लागण झालेली नव्हती. परंतु याच वेळेला गावातील whatsapp ग्रुप वर गुळवेलचा काढ्याचे महत्व व काढा कसा बनवायचा याचा व्हिडिओ टाकला. प्रत्येकाला महत्व समजले.गावातील 30%लोक काढा प्यायला लागले.पण नंतर गावात आणखीन 20 लोक करोना बाधीत असल्याचे लक्षात आले. मग बाकी सर्व गाव मिळेल तिथून गुळवेल आणून काढा करून प्यायला लागले. याचा परिणाम असा झाला की ज्या घरात करोना बाधित रुग्ण आहे. त्याच कुटुंबातील इतर सदस्यांनी काढा पिल्यामुळे त्यांची टेस्ट negative आली. लोकांचा गुळवेल काढल्यावर आणखीन विश्वास बसला आणि आता संपूर्ण गाव गुळवेल चा काढा पीत आहे. एक महिन्यापासून गावात एकही व्यक्ती करोना बाधीत नाही.


गुळवेलच्या काढ्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गुळवेल आपली श्वसन संस्था बलवान बनवतो. आपल्या पांढऱ्या व तांबड्या पेशींना रोगाशी लढण्याची ताकत देतो. अनेक रोगांवर रामबाण आहे. आपल्या रक्तातील oxygen प्रमाण वाढवतो, त्यामुळे आपण या जीवघेण्या करोना आजारापासून दूर रहातो.
या गुळवेल काढ्यामुळे माझं गाव पूर्णतः करोना मुक्त झाले आहे.

माहिती संकलन :
प्रा बाळासाहेब निमसे
9421560815
close