shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिसातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..!!



८१रक्तदात्याने रक्तदान केले ,प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षाचे आपघाती विमा योजना प्रमाणपत्र देण्यात आले..

खर्डा प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान करण्यासाठी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केलेल्या आहावांना चांगला प्रतिसाद मिळाला .कोरोनाच्या महामारी ने सर्वत्र थैमान घातलेले  पहावयास मिळत आहे यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असल्याने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे खर्डा पोलिस स्टेशन येथे आयोजन करण्यात आले होते.
    


" माझी जबाबदारी माझा खर्डा" हे आपले ब्रिद वाक्यं मनाशि एक निश्चित करून शासनाने घालून दिलेले करोना निर्बंध सातत्याने पाळून व इतरांना ही हे नियम पालन करण्यास संभोधीत कराल त्याच वेळी आजार देशातुन हद्दपार होईल.
       -  संभाजी गायकवाड, जामखेड 
               पोलिस निरीक्षक.

राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे.रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे येत आहे आहेत. नगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी जामखेड पोलिस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र दिनी खर्डा येथे  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.  त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाले या शिबिराचे उद्घाटन सरपंच आसाराम गोपाळघरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

राज्यात १८ वर्षावरील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या काळात पुढील दीड ते दोन महिने लस घेतलेल्या नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये, याकरिता लसीकरणाआधी युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला खर्डा आणि परिसरातुन  उस्फुर्त प्रतिसाद मिळले असुन सकाळपासून  युवकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळुन  रक्तदात्याने रक्तदान  केले.
    
रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीरे घेण्यात येतात.अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करताना दिसत आहेत परंतु जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून  आयोजित केलेल्या  रक्तदान शिबीराचे खर्डा सह  तालुक्यात चर्चेचा विषय ठरले असून सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
   
यावेळी ग्रा.प.सदस्य प्रकाश गोलेकर, सुनील लोंढे,माजी उपसरपंच भागवत सुरवसे, बिभिषण चौघुले, चंद्रकांत गोलेकर,संतोष लष्करे, डॉ.बिपिनचंद्र लाड , तरुण वर्ग आहे.साहयक पोलिस निरीक्षक बडे साहेब पो.नाईक संभाजी शेंडे पो.काॅ.शशिकांत म्हस्के, पो.काॅ.विष्णु मेहत्रे,पो.काॅ.नागरगोजे,पो.काॅ.जायभाय व खर्डा होमगार्ड यांनी हा कार्यक्रम यशस्वी केले.


close