shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हातवळणं मध्ये १०० पैकी २६ बाधीत रुग्ण आढळले..!


नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून कोरोना तपासणी ‌रॅपड ॲटिजन स्टेट किट उपलब्ध नव्हते.हि किट लवकर उपलब्ध ते साठी सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ.दिलीप पवार ,माजी उपसभापती रविंद्र भापकर,मा.सभापती प्रविण कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कालेॅ, माजी जिल्हा सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती रामदास भोर या पदाधिकारीनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा व केल्या मुळे आज आरोग्य विभागा कडे  कोरोना  तपासणी किट उपलब्ध झाल्याने नगर तालुक्यातील हातवळणं या गावात कोरोना  तपासणी कँप आयोजित करण्यात आला. 

यात गावा प्रमाणे कोरोना बांधीत संख्या हातवळणं ०३, तांदळी वडगाव ०१, मठपिंप्रि ११,वाटेफळ,०३,तांदळी १,कोयाळ १, हातवळणं (ता.आष्टि) १, तरंड गव्हाण (ता.श्रींगोदा) ५, अशा  प्रकारे कोरोनो बांधीत आढळून आले.

या रुग्णा पुढील उपचारासाठी अरणागाव.चिचोडी पाटील कोणाला खाजगी हाॅस्पिटल कडे रवानगी करण्यात आली.या वेळी या रूग्णांना १०८ नंबर अँब्युलन्स मध्ये साहनभुती पुर्वक बसुन कोरोना  बांधीत रुग्णाना आधार देण्याचे काम पंचायत समिती माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी केले. तसेच हा कँप यशस्वीतेसाठी हातवळणं गावचे सरपंच बाळासाहेब मेटे. बाळासाहेब चेमटे, मठपिंप्रि संरपच हौसरराज नवसुपे, अतुल चौधरी,फनसे भाऊसाहेब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
close