रोहीत बजरंग साळोखे या वडार युवकास न्याय न मिळाल्यास मी वडार महाराष्ट्राचा ही संघटना राजारामपूरी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करणार..!
कोल्हापूर प्रतिनिधी:- शाहूनगर(वड्डवाडी)राजारामपूरी कोल्हापूर येथील रोहीत बजरंग साळोखे(22वय) या निषपाप वडार युवकास राजारामपूरी पोलीस स्टेशनने मोका लागु केला आहे.दि.4एप्रिल रोजी शाहू टोल नाका येथे झालेल्या मारामारीत सदर युवकाचा काही संबंध नसताना जाणुन बुजुन या युवकाला यात आडकवले आहे.सदर युवक हा रोजनदारी करुन घरगाडा चालवतो आहे.त्या संपुर्ण कुटुंबातील व्यक्ती या युवकावर आवलंबुन आहेत.या युवला लवकरात-लवकर न्याय मिळावा न मिळाल्यास राजारामपूरी पोलीस स्टेशन समोर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेकडुन आमरण उपोषणास बसणार आहे. असे मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या शिष्टमंडळा कडुन राजारामपूरी पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक डुबल साहेब यांना निवेदन देण्यात आले.
मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले,संघटनेचे राज्य चिटणीस तानाजी पवार,पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष रवी बाॕस शिंदे,संपर्क प्रमुख सुधीर पवार यांच्या आदेशाने व सहकार्याने शशिकांत वाटेगावकर सांगली जिल्हा अध्यक्ष,अर्जून देशमुख कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,संजय शिंगाडे कोल्हापूर शहर अध्यक्ष,सुरेश वडर पन्हाळा तालुका अध्यक्ष,शितल तिवडे महीला अध्यक्ष,सुरेश साळोखे,बाजरंगा साळोखे,अनिल मोहीते,अंजली साळोखे,नंदा गावणकर,कल्पना नलवडे,दिपा पवार,साधना साळोखे,रंजना पाथरवट,आश्विनी साळोखे,संगिता साळोखे,सुनिता साळोखे,रुपाली साळोखे,यासह संघटनेचे महीला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
राजारामपूरी पोलीस स्टेशन मन्ये निवेदन देताना पदाधिकारी.

