प्रतिनिधी । स्नेहा उत्तम मडावी:
सामाजिक बांधिलकी जपत कोविड केअर सेंटरला मदतीचा ओघ सुरूच !
घोडगंगा: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.रावसाहेबदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री.संजय चव्हाण, श्री.अतुल चव्हाण आणि श्री.योगेश चव्हाण या बंधूनी त्यांचे वडील श्री.सुरेशराव व मातोश्री सौ.उषाताई यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोविड केअर सेंटरसाठी रावलक्ष्मी फाउंडेशनला ५१,०००/- रूपयांचा धनादेश कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार आणि माजी सभापती सौ सुजाता अशोक पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
आपण केलेल्या या मदतीमुळे इतरही अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास आहे. आपले मनःपूर्वक आभार !

