shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हरेगाव उंदिरगाव मध्ये आज पासुन सात दिवस कडक लाँकडाउन..!


ऊंदिरगाव-  श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव-हरेगाव येथे कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण बघता दोन्ही  गावच्या   ग्रामपंचायतीने आज पासुन सात दिवसाचा कडक लाँकडाउन  जाहीर केला असून दवाखाने  व मेडीकल यांना यातुन वगळण्यात आले आहे.

ऊंदिरगाव प्राथमिक आरोग्य  केंद्रात रॅपीड टेस्ट किट शिल्लक  नसल्याने या दोन्ही गावात पाॅझीटीव्ह रुग्ण कीती आहे हे सांगणे अवघड आहे.

गावातील कोरोना रुग्णाचा मृत्यू दर बघता निश्चितच पाँझीटीव्ह रुग्णाचा आकडा हा मोठा असू शकतो. दोन्ही गावात वाढता मृत्यू  दर बघता दोन गावाच्या ग्रामपंचायत एकत्र  येत आपत्कालीन बैठकीचे आयोजन केले होते. 

यामध्ये दोन्ही गावाच्या कार्यक्षेत्र असलेल्या भागात गुरुवार ६ मे ते बुधवार १२ मे पर्यत कडक लाँकडाउन करण्याचे ठरले.


वैद्यकीय सेवा लगळता इतर दुकाने व्यवसाय करताना दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ऊंदिरगाव ,  हरेगाव  सरपंच  व उपसरपंच यांनी सांगीतले.

या बैठकीला कोरोना दक्षता कमेटीचे अध्यक्ष तथा सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके तसेच हरेगाव सरपंच सौ.मंदाकिनी गाडेकर उपसरपंच चेतन त्रिभूवन ,  यांचे सह उंदिरगाव व हरेगाव कोरोना कमिटी,  दुकानदारवर्ग तसेच अशोक कारखान्याचे संचालाक सुरेश पा.गलाङे , दुध संघाचे संचालक राजेंद्र पा पाऊलबुध्दे ,भाऊसाहेब बांद्रे ,  बाळासाहेब नाईक  सोमशे ,  रमेश भालेराव ,   विरेश पा.गलाडे,  ग्रां प सदस्य प्रकाश,  आनिल भनगडे  , दिपक बोधक , निपुंगे,  सचिन गायकवाड ,  विशाल गायकवाड तसेच व्यापारी वर्ग प्रतिनिधी राजू शेठ दुधडिया,  किशोर शेठ , सुभाषशेठ चोरडिया , तांबोळी ईसाकभाई,   भाटीया ,दतु पा नाईक , राहूल पंडित सह कमेटी सदस्य हजर होते.
close