shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज-कळंब हायवे वरील आडसकर साहेब यांच्या पेट्रोल पंपावर दिड लाख रु. च्या डिझेलची चोरी..!!



प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी  :- 
केज येथील कळंब रोडच्या हायवेवर  भाजपाचे नेते रमेश आडसकर यांच्या मालकीच्या नवीन सुरू झालेल्या पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीच्या झाकणाचे कुलूप तोडून आतील दीड लाख रुपयाच्या डिझेलची चोरी झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोडवर कमल पेट्रोलियम या नावाने भाजपा नेते रमेश आडसकर साहेब यांचा एक महिन्यांपूर्वी पेट्रोल पंप सुरू झाला आहे. 


१ मे रोजी मध्यरात्री धुमारे १२:३० वा. च्या नंतर अज्ञात चोरांनी पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून त्याला मोटार लावून त्यातील डिझेल खेचून कॅन मध्ये भरले. ते एका वाहनात ठेवत असताना पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करताच अज्ञात चोरटे १ लाख ४९ हजार १६७ रु. किंमतीचे १७०० लिटर डिझेल प्लॅस्टिकच्या कॅन मध्ये भरून ते वाहनात ठेवून केजच्या दिशेने पसार झाले. या गडबडीत चोरट्यानी ४१ प्लॅस्टिक कॅन मध्ये काढून घेतलेले सुमारे १७०० लिटर डिझेल शेजारी शेतात ठेवले असल्याने ते मात्र वाचले. 

या बाबत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. २१९/२०२१ भा. दं. वि. ३७९ व ३४ नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे या तपास करीत आहेत.
close