shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक करमाळा यांची कामगिरी.. सहा वर्षापासून फरारी असलेला आरोपी अटकेत..!


प्रतिनिधी । सुर्यकांत होनप.
करमाळा:- करमाळा शहरातील कृष्णाजी नगर भागात 2013  साली जबरी दरोडा टाकून एक लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याप्रकरणी पाच दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला होत. 

पोलिसांनी त्यातील चार आरोपींना ताब्यात घेतले होते  व 1 आरोपी फरार होता. करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाला बातमीदार मार्फत माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून सदर फरार आरोपीस करमाळा ते जामखेड रोड वर पोथरे नाका येथे ताब्यात घेतले.

सदर आरोपी हा करमाळा पोलीस ठाणे कडील भाग पाच  गुन्हा रजिस्टर नंबर 312/2013 भादवि कलम 395 मधील फरार आरोपी असून त्याचे नाव नंद्या सुल्ल्या  पवार वय 32 वर्षे राहणार जवळा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर असे आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर ,पोलीस कॉन्स्टेबल तौफिक काझी,चंद्रकांत ढवळे, हनुमंत गवळी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक  सचिन जगताप हे  करत आहेत.
close