shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्री साहेब एसटी कर्मचाऱ्यांना वाचवा ...महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा ... सरचिटणीस श्रीरंग बरगे


नागपूर विभागीय सचिवांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन...!


नागपूर (दि .३०) :
कोविड १९ च्या प्रभावामुळे एस.टी. महामंडळातील कर्मचा-यांची आर्थिक स्थिती फार कमजोर व हलाकीची झाली आहे. 

श्रीमती मनिषा कालेश्वर 


एस.टी. महामंडळातील उत्पन्नात कमालीची घट बघता आणि सर्वांत मुख्य म्हणजे यावर उपाय म्हणून महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करावे अशी महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी कांग्रेस यांची मागणी आहे.

राज्यातील सुमारे एक लाख कुटुंबे महामंडळावर अवलंबून आहेत. मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते , दैनंदीन खर्च भागविणे कर्मचा-याला शक्य होत नाही. दिवसेंदिवस परीस्थिती बिकट होत चालली असून कोरोना संसर्गाच्या काळात उपचार करण्यासाठी सुध्दा कर्मचा-यांकडे पैसे नाहीत. याकरीता विलीनीकरण महत्वाचे आहे. तसेच एस. टी. महामंडळाला कामगिरी बजावण्यासाठी विलीनीकरण आवश्यक आहे. तसेच एस.टी. टीकविण्यासाठी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणे हाच एकमेव मार्ग आहे. असे एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटनिस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

तसेच एस. टी. महामंडळाला शासनाने अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिलेला आहे . त्यामुळे शासन आवश्यकतेनुसार एस.टी.चा पुरेपूर वापर करतात. जसे निवडणुकीच्या वेळेस ,यात्रेच्या वेळेस, सध्य स्थितीत कोरोना काळामध्ये पण कर्मचारी आपले प्राण धोक्यात टाकुन आमचे कर्मचारी कामगीरी करतात. अशा पद्धतीने एस.टीचा पुरेपूर वापर केला जातो. 

परंतु शासन एस.टी महामंडळाच्या कर्मचा-यांचा आर्थिक बाबींचा व त्यांच्या वेतनांचा विचार करत नाही. जसे वार्षिक वेतनवाढ हि तीन टक्के होती. ती तीन वर्षा पासुन दोन टक्के केली आणि अजुनही तीच परिस्थिती कायम आहे. 

तसेच २०१६ -२०२० चे दोन करार थकीत आहेत. अदयाप पर्यंत कोणताही विचार प्रशासनाने केलेला नाही. तसेच बाकी विभागाच्या तुलनेत एस.टी. महामंडळाच्या कर्मचा-यांना घरभाडे भत्ता व महागाई भत्ता यापासुन सुद्धा महामंडळातील कर्मचारी वंचित आहेत. अश्याप्रकारे महामंडळाच्या कर्मचा-यांची दैनिय अवस्था झाली आहे.

तरी शासनाने महामंडळातील कर्मचा-यांची दयनीय अवस्था बघता वरिल सर्व बाबींचा विचार करून जातीने लक्ष दयावे. ज्याप्रमाने इतर विभागाचा आवर्जुन विचार करून त्यांच्या समस्या दूर करता  तसेच महामंडळाकडेही आपले थोडेतरी लक्ष दयावे.

म्हणुनच कुठल्याही परीस्थितीत सरकारने एस.टी. महामंडळाला कमीत कमी शासनाचा एक भाग जाहीर करावा आणि एस.टी. महामंडळाला वाचवुन आर्थिक मदत दयावी की जेणे करून एसटी महामंडळातील कर्मचारी समाधानाने आपले आयुष्य जगतील अशी कळकळीची विनंती नागपुर विभागीय सचिव श्रीमती मनीषा कालेश्वर यांनी केली आहे .

सदर निवेदन हे मा. श्री. अजितदादा पवार, उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई. तसेच मा. श्री. अनिल परब , परीवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई. तसेच मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ मुंबई. आणि मा.विभाग नियंत्रक, राज्य परीवहन, नागपुर.
यांनाही देण्यात आले आहे .
close