shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना रुग्णांसाठी शिक्षकांनी उभारला नऊ लाखाचा निधी ...!



सात ऑक्सिजन HB कॉन्सरट्रेटर मशिन्स तहसिलदारांकडे केले सुपूर्त...!

प्रतिनिधी : आसावरी वायकर
करमाळा (दि.२५) :  करमाळा तालुका जिल्हा परिषद,नगर पालिका व एकलव्य आश्रम शाळा येथील सर्व शिक्षक यांनी सामाजिक बांधिलकी जपत 9लाख रुपयांचा मदत निधी जमा केला .
त्यातून ऑक्सिजन अभावी  गंभीर झालेल्या कोरोना रुग्णांसाठी 10 लिटर क्षमतेच्या 7 आक्सिजन HB कॉन्सरट्रेटर मशिन्स जिल्हा पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा.श्री अनिल कारंडेसाहेब, मा तहसीलदार श्री समीर माने साहेब,मा.मुख्याधिकारी श्रीम.वीणा पवार मॅडम, गटविकास अधिकारी मा. श्रीकांत खरात साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.श्री. राजाराम भोंग साहेब,सभापती मा. गहिनीनाथ ननवरे आप्पा ,उपसभापती मा. दत्तात्रय सरडे,पं. स.सदस्य मा.ऍड. राहुल सावंत,डबल उपमहाराष्ट्र केसरी मा.अतुल पाटील ,मा.दत्ता जाधव व युवा नेते मा. शंभूराजे जगताप  आणि करमाळा तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत सर्व ऑक्सिजन कॉन्सरट्रेटर  मशिन्स मा. तहसीलदार साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या. 

यावेळी मा .उपजिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब व न . पा . मुख्याधिकारी मॅडम यांनी  या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले .
close