shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फक्त कोरोना कोरोना म्हणत बसू नका गरजुंना मदतही करा . महामारी च्या काळात गरिबांचे हाल बघवत नाहीत .... प्रिती राठोड..!!



प्रतिनिधी : संजय वायकर
पूणे (दि.१०) :  येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून बुधभूषण फाउंडेशन सामाजिक संघटनेचे नाव सध्या संपूर्ण राज्यात पसरत असून निराधार ,दिव्यांग व्यक्ती , अनाथ ,गरजु व्यक्तींना मदत करण्याचे सामाजिक कार्य करत आहे बुधभूषण फाउंडेशन . 

या फाउंडेशन ने आजपर्यंत अनेक सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चांगली व नाव लौकिक अशी भरीव कामे केली आहेत . सर्वसामान्यांच्या हृदयात जाऊन बसणाऱ्या 'बुधभूषण फाउंडेशन ' चा उगम पुणे जिल्ह्यात झाला . 

बुधभूषण चे भरीव कार्य फाउंडेशन चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते राज्यभरात करत आहेत .'ना जातीभेद ना पक्षभेद 'अशा पद्धतीने बुधभूषण फाउंडेशन चे कार्य अखंड चालू आहे.

या महामारीच्या काळात  हातावरील पोट असणारे , रोजंदारी करणारे यांचे कित्येक दिवसांपासून काम बंद आहे . या गरिबांचे हाल बघवत नाहीत. प्रशासन या सर्व गरजु व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही . परिणामी  सर्वच सामाजिक संघटना आणि संस्था यांनी  मदत करायला हवी . असे बुधभुषण फाऊंडेशन च्या सदस्या प्रिती राठोड यांनी सांगितले .

कोरोना सारख्या आजाराने जगात थैमान घातलेले असताना आणि लॉकडाऊन मूळे बिकट परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या निराधार , गरजु व्यक्तींना , कोरोना बाधितांना पूणे येथे फाऊंडेशन मार्फत प्रिती राठोड यांनी  जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले .
यावेळी महेंद्र राठोड ,राजेश राठोड यांनी सहकार्य केले .

पुण्यातील कसबा पेठ, शनिवार पेठ, कार्पोरेशन ब्रीज , बाजीराव रोड , शनिवारवाडा या भागात अन्नधान्य, मसाले , चहा पावडर याचे वाटप करण्यात आले .

या उपक्रमात बुधभुषण फाउंडेशनचे चेअरमन श्री .अमोल दुरंदे, व्हा.चेअरमन श्री. दुर्गेश राठोड सचिव श्री .रूपेश लाटे संस्थेचे विश्वस्त विशाल जकातदार ,वैभव शिंदे , अनिल गोडगे, सुखदेव शिंदे , विकास राठोड ,ज्ञानेश्वर शिंदे , सुधाकर खळदकर उपस्थित होते .
close