सौ सुजाता भाभी अशोक पवार जिल्हा परिषद सदस्य यांनी केलेल्या आव्हानाला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद..!
पुणे । प्रतिनिधी (स्नेहा उत्तम मडावी):
न्हावरे गावचे प्रसिद्ध किराणा व्यावसायिक श्री केशरचंदजी बोथरा आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ.सरसबाई यांच्या लग्नाच्या ६३व्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत आज उरळगाव येथील कोव्हिड सेंटर येथे सकाळचा चहा नाष्टा ,दुपारचे जेवण ,संध्याकाळी चहा बिस्कीट तसेच रात्रीचे जेवण देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
खऱ्या अर्थाने त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आज साजरा झाल्याच समाधान त्यांचे पुत्र श्री.बाबूशेठजी बोथरा व त्यांचे नातू श्री चेतनशेठ बोथरा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला.
बाई अन भावसा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

