फेसबुक, ट्विटर दोन दिवसांनी ब्लॉक होणार? सरकारची नवी मार्गदर्शक तत्वे लागू होणार...!
सांगली । प्रतिनिधि(अनिल पोवार):
दि २५ मे २०२१
सरकार दोन दिवसात सोशल मीडिया माध्यमांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे लागू करणार आहे. ही तक्रार निवारणासंदर्भातील तीन स्तरीय नियमावली आणि तत्वे डिजिटल कंटेटसाठी असणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या मार्गदर्शक तत्वांचा फेसबूक आणि ट्विटर यासारख्या मोठ्या कंपन्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि महिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २५ फेब्रुवारीला न्यूज वेबसाठईट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म तसेच सोशल मीडिया कंपन्यांना तीन महिन्यात नव्या मार्गदर्शक तत्वानुसार आपल्या संस्थेत बदल करण्यास सांगितले होते.
सरकारच्या मते या नव्या नियमांमुळे एक व्यवस्था निर्माण होईल. ज्यामुळे सर्वांनाच न्याय मिळण्यास मदत होईल. या नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कंपन्यांनी एक कंप्लायन्स ( अनुपालन ) अधिकारी नेमण्याचा आणि त्याचे नाव आणि संपर्क करण्यासाठीचा भारतातील पत्ता देणे बंधनकारक असणार आहे. याचबरोबर तक्रार निवारण, आक्षेपार्ह मजकुरांवार लक्ष ठेवणे, कंप्लायन्स रिपोर्ट देणे आणि आक्षेपार्ह मजकूर काढून टाकणे या महत्वाच्या जबाबदाऱ्याही या अधिकाऱ्यावर नव्या मार्गदर्शक तत्वानुसार असणार आहेत.
सरकारने तीन महिन्यांचा दिलेला अल्टिमेटम २५ मे रोजी म्हणजे आज संपणार आहे. पण, आतापर्यंत एक कंपनी सोडली तर इतर कोणत्याही कंपनीने अशा प्रकारचा अधिकारी नियुक्त केलेला नाही.

