प्रतिनिधी । आसावरी वायकर :
अ .नगर (दि.२३) : करोनासारख्या महामारीच्या काळात भारतात प्रशासन विविध उपाययोजना आखून कोरोनाबाधित रुग्णांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे .विविध संस्था, राजकीय पक्ष , पुढारी कोवीड १९ विषाणूच्या विरोधात सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत . तसेच कोवीड बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाकाईकांसाठी या आजाराला घाबरून न जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन होणे खुप गरजेचे आहे.
म्हणूनच जैन समाजाचे मुनिश्री प्रमाणसागरजी महाराज यांनी करोनाविषयी सुंदर माहितीपूर्ण विचारांचे मार्गदर्शन संपूर्ण मानव समाजाला केले आहे .
महाराजांनी सांगितले की , करोना आजाराला घाबरू नका .मनाला मजबुत करा . ही महामारी आली आहे तर ती जाणारही आहे . तुमचे मन मजबुत असेल तर तुम्ही या आजाराला हरवू शकाल . दुसरे कित्येक आजार नीट होतात. कोरोना सारखा आजारही पूर्णतः नीट होईल नष्ट होईल.
आपल्या मनाला अध्यात्मिक बनवा .करोना आजार हा शरीराला आहे मनाला नाही . सावधानता बाळगा . एकमेकांच्या संपर्कात येवु नका . घरीच रहा सुरक्षित रहा . ही तुमची जबाबदारी आहे . प्रकृतीच्या प्रकोपाला सर्वांनाच झेलावे लागत आहे . पण कधीतरी त्यात सुधारणा होईल आणि पूर्णपणे सर्व ठिक होईल.
या पृथ्वीतलावर महामारी ही काही पहिल्यांदाच आली नाही . कित्येक शतकांपासून महामारी ठराविक अंतराने येतच आहे. ही वैश्विक आपत्ती आहे . सर्वसमाजाने एकत्र येवून याचा नायनाट करायला हवा .

