अहिल्यारत्न पुरस्काराने संपादक पत्रकार धनंजय कळमकर आणि निर्भीड पत्रकार कैलास पवार यांना सन्मानित
![]() |
| इंदापूर अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त राजे यशवंतराव होळकर युवा संघ व तेजपृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या वतीने संपादक पत्रकार धनंजय कळमकर व निर्भीड पत्रकार कैलास पवार यांना अहिल्यादेवी रत्न पुरस्कार प्रदान करतानां नानासाहेब खरात व इतर ( छाया: दीपक खिलारे) |
पत्रकार क्षेत्रातील आणि कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून उल्लेखनीय कामगिरीची दखल
राजमाता अहिल्यादेवी होळकर २९६ व्या जयंतीनिमित्त राजे यशवंतराव होळकर युवा संघ व तेज-पृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या वतीने पुरस्कार प्रदान
सोलापुर प्रतिनीधी:
दि.३१ इंदापूर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजे यशवंतराव होळकर युवा संघ व तेज-पृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या वतीने कोराना काळात उल्लेखनीय, सामाजिक कार्याबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अधिकारी, पदाधिकारी यांना अहिल्यारत्न पुरस्कार समारंभ आयोजित केला होता . हा पुरस्कार सोहळा सोहळा (दि.३१) मे रोजी सकाळी ११ वाजता इंदापूर न्यायालय आवारातील राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्या समोरील मैदानात हा सोहळा संपन्न झाला.
रोख ठोक लिखाण, वस्तुनिष्ठ, पुराव्यानिशी बातमी देणे, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक ,नाट्य, कला, अशा विविध क्षेत्रातील आणि शेतकरी आणि बहुजन हिताच्या व सदैव समाज हिताच्या बातम्या देऊन आपल्या लेखणीतून निर्भीड पणे लिखाण करून समाजातील वास्तव वस्तुनिष्ठ ते मांडत असतात. त्याचप्रमाणे कोरोना काळात अनेक रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना, नाश्ता, जेवण ,ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर अनेक प्रकारच्या गोळ्या, औषधासाठी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मदत करत असतात.
शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडून त्यांना न्याय देण्याचा छोटासा प्रयत्न करत अनेक रुग्णांना, नातेवाईकांना विविध प्रकारची मदत केली तरी आपल्या लेखणीतून त्याची कुठेही वाच्यता, बोलबाला ,गाजावाजा , जाहिरातबाजी न करता समाज कार्य समाजासाठी, समाज सेवा ,आपली लेखणीची सेवा जनतेसाठी करत असतात . यांच कार्याची दखल घेत पुरस्कार निवड समिती पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, आप्पासाहेब पवार, नानासाहेब खरात, पोपट पवार ,तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक, अध्यक्षा अनिता खरात आणि राजे यशवंतराव होळकर युवा संघ इंदापूर आणि तेज पृथ्वी ग्रुप इंदापूर च्या वतीन अष्टपैलू संपादक ,पत्रकार धनंजय कळमकर आणि निर्भीड पत्रकार कैलास पवार यांची अहिल्यादेवी रत्न पुरस्कारासाठी निवड केली आणि अहिल्यादेवी यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त इंदापूर येथे अहिल्यादेवी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजे यशवंतराव होळकर संघ व तेज पृथ्वी ग्रुप इंदापूर यांच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा आयोजित केला होता .त्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर पुरस्कार सन्मानित मान्यवर संपादक पत्रकार धनंजय कळमकर आणि पत्रकार कैलास पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माजी सैनिक मेजर संपादक, पत्रकार विलासराव गाढवे, ज्येष्ठ पत्रकार डॉ.संदेश शहा,डाँ. विकास शहा , अतुल तेरखेडकर या ज्येष्ठ पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वेळेवर मार्गदर्शन आणि मदत करत असतात सामाजिक विविध क्षेत्रातील समाजाचे काहीतरी देणे लागतो वंचित बहुजन सामाजिक विविध क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडून त्यांना न्याय देण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो
आमच्या या छोट्याशा कार्याची दखल घेऊन आम्हाला पुरस्कार प्रदान केला आमचा बहुमान केला सन्मान केला त्याबद्दल राजे यशवंतराव होळकर युवा संघाने त्याची पृथ्वी ग्रुप यांनी आम्हाला सन्मानित केले त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित मान्यवर माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील , इंदापूर तहसीलदार अनिल ठोंबरे ,पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर , मधुकर भरणे इंदापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी सुनील गावडे,जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा.जिल्हा परिषद सदस्य व माजी बांधकाम आरोग्य सभापती प्रवीण माने, नगरसेवक अनिकेत वाघ, डॉ .चंदनशिवे, डॉ . सुहास शेळके , पत्रकार सुरेश मिसाळ, देवा राकुंडे , तात्याराम पवार, निलेश भोंग, इन्तिहाज मुलाणी , जितेंद्र जाधव ,सिद्धार्थ मखरे, दीपक खिलारे, श्रेयस नलवडे, अवधूत गुप्ते, रमेश तुले ,अर्चना गोरड,जयश्री नगरे माधुरी लडकत, विलास दोलतोडे , शिवाजी इजगुडे ,अशोक इजगुडे ,माऊली चवरे,पांडुरंग मारकड,ॲड .राहुल मखरे, विलास वाघमोडे,शेखर पाटील ,संयोजक अनीता नानासाहेब खरात ,महिंद्र रेडके,आप्पासाहेब माने,पोपट पवार, नानासाहेब खरात ,प्रसाद पाधे,संपत पुणेकर ,संतोष कुंभार,मनीषा हरणावळ आदी मान्यवर उपस्थित होते.
----------


