shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना च्या संकटात आधीच शेतकरी गेलाय कोलमडून...!शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून द्या - शंभुराजे फरतडे यांची मागणी..!!

प्रतिनिधी । आसावरी वायकर:

करमाळा (दि .22) : शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
 
शंभुराज फडतरे


या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की , कोरोनाच्या  संकटात शेतकरी अगोदरच कोलमडून गेला आहे .त्यातच खरीप हंगाम तोंडावर असताना शेती कामासाठी शेतकऱ्यांना पेट्रोल ,डिजेल ची अत्यंत गरज आहे . उन्हाळ्याचे दिवस सुरु असून खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेती मशागतीची कामे सुरु आहेत . नांगरणे,मोगडणे यासाठी ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही .तसेच काही शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे शेती नुकसान टाळण्यासाठी शेतातुन चाऱ्या काढणे,ताली टाकणे यासाठी जेसीबी शिवाय पर्याय नाही . त्यामुळे ट्रैक्टर व जेसीबी साठी शेतकऱ्यांना डिझेल अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून निघालेल्या आदेशात फेरबदल करुन शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल देण्याचा आदेश काढावा असे म्हटले आहे .

पेट्रोल पंपावर डिझेल साठी ट्रॅक्टर किंवा जेसीबी घेवुन जाणे परवडणारे नसल्याने शेतकरी मोटरसायकलला ड्रम बांधून पेट्रोल पंपावर जात आहेत. परंतु पोलिसांकडून मात्र गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे .

पावसाळा तोंडावर असल्याने शेती मशागतीची कामे खोळंबली तर शेतकऱ्यांना खुप अडचणींचा सामना करावा लागणार आहे .

तरी मा .जिल्हाधिकारी, मा . तहसिलदार, मा .पोलिस निरीक्षक यांनी शेतकऱ्यांना शेती कामाच्या डिझेल साठी सवलत द्यावी .अशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक तथा पत्रकार शंभुराजे फरतडे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे .
close