shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर तालुक्यातील दहिगाव या ठिकाणी कोरोना तपासणी कँप ८० पैकी ४ बाधित..!!


नगर ।  प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील दक्षिण भागातील गावा कडे कोरोना  वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपसभापती रविंद्र भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दहिगाव या ठिकाणी आधीचे १०ते १२ रुग्ण बांधीत असल्यास मुळे वाढता कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी आज दहिगाव येथील श्रीराम मंदिर येथे  रिपिड ॲटिजन टेस्ट तसेच घशाती आर टीसी तपासणी कँप आयोजित करण्यात आला होता. या कँप मध्ये एकुणा  ८० व्यक्ती तपासणी
करण्यात आली यांत ४ व्यक्ती कोरोना  बांधीत आढळून आले.निगेटिव्ह ७४ आढळले.

दशमीगव्हाण २, साकत१, वाळुंज १, या बांधीत रुग्णांना वाळुंज  येथील कोवीड सेंटर या पाठवण्यात आले.तर कही रुग्ण चिचोंडी पाटील येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. दहिगाव कोरोना तपासणी कँप ‌दरम्यान  नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी  अर्जुन श्रीनिवास साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशासकीय यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी काम व्यवस्थित पणे पार पाडले जात आहे. की नाही हि  यांची पाहणी केली अडचणी समजून घेतल्या या वेळी भाजीपाला वेळेची मर्यादा संपल्या नंतर हि विक्री करताना आढळल्याने  ग्रामसमितीस दंड  करण्याचे आदेश दिले. अधिकारी कर्मचारी उपस्थितीचा अहवाल सादर करण्याचे  निर्देश दिले आहे.

या वेळी पंचायत समितीचे  दहिगावचे सरपंच मधुकर म्हस्के, सुनील म्हस्के सर , पत्रकार शिवा म्हस्के,हा कँप यशस्वीतेसाठी रुईछत्तीसी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे, 
डाॅ.हिवाळे, परिचारिका कसबे, सोमनाथ जाधव,के.आर उगले,बी.षी जाधव,अंगणवाडी सेविका कमल जरे, आशा सेविका आशा जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी पाराजी माने,आदी ग्रामस्थां उपस्थित होते.
close