प्रतिनिधी : संजय वायकर
धुळे (दि.९): कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई बेस्ट उपक्रमाची वाहतूक रा.प. महामंडळातर्फे घेण्यात येत आहे . धुळे विभागातील कर्मचारी हे काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत कृती समितीने लेखी तक्रारी दिलेल्या आहेत.
मुंबई येथे बेस्ट उपक्रमात काम करून आल्यावर अनेक कामगार कोरोना बाधित झाले तर त्यातील काही कामगार दगावले . तर काही कामगारांच्या कुटुंबांना कोरोना ची लागण झाल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . परिणामी धुळे विभागातील कर्मचारी मुंबई येथे जाण्यासाठी तयार नाहीत.
कोरोना च्या सुरुवातीच्या काळात चालक वाहक कार्यरत असताना कोरोनाबाधित झाले . त्या बाबत स्थानिक लोक प्रतिनिधी मा.आमदार फारूख शहा व मा.आमदार कुणाल बाबा पाटील तसेच पालकमंत्री मा.अब्दूल सत्तार साहेब धुळे यांनाही कृती समिती मार्फत निवेदन देण्यात आले आहे .
दि.३०.४.२१ रोजी विभाग नियंत्रक धुळे तसेच मा.उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुंबई , मा.जिल्हाधिकारी धूळे, पोलिस निरिक्षक , सुरक्षा दक्षता अधिकारी, कामगार अधिकारी धुळे आणि सर्व संघटना सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई
यांनाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे .
*मार्च २०२० मधे कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात प्राणांची पर्वा न करता कुदुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता कोटा राजस्थान येथुन विद्यार्थ्यांना तसेच परप्रांतीय मजुरांना सुखरूप त्यांच्या गावी पोहचविले . तरीही वारंवार धुळे विभागावरच अन्याय होत आहे .*
दि.२८ एप्रिल रोजीचे मा . महाव्यवस्थापक वाहतूक यांचे पत्र क्र .१६०५ हे पाहता धुळेच्या कामगारांमध्ये संताप उद्रेक झाला आहे . इतर विभागांनी खुपच अल्प कामगिरी केली असताना त्यांना वगळण्यात आले असून धुळे विभाग मात्र कायम ठेवला आहे .
मुंबई बेस्ट उपक्रमातून धुळे विभागास त्वरीत न वगळल्यास २१ मे पासून सर्व संघटनायुक्त संयुक्त कृती समिती रा.प.धुळेचे पदाधिकारी कोरोना निर्बंधाचे पालन करून उपोषण आंदोलन करणार असल्याचे विभाग सचिव यांनी सांगितले .

