shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशातील कोरोना कहर संपता संपेना..! ४ लाखांहून अधिक बाधितांची होतेय दररोज नोंद..!!

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा भयानक कहर काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद होताना दिसून येत आहे.तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तब्बल ४ लाख १ हजार ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळले तर ४ हजार १८७ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, आज नोंद झालेल्या आकडेवारीनुसार देशात संक्रमित होणाऱ्यांची एकूण संख्या 2 कोटी 18 लाख 92 हजार 676 वर गेली आहे.

close