shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श निवृत्त शिक्षक आदिनाथ अभंग व त्यांच्या पत्नी मंगल यांचे दुःखद निधन ...!

करमाळा तालुक्यात शोकाकूल वातावरण ...!

प्रतिनिधी । संतोष वायकर :

 करमाळा ( दि .२१ ) :  करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावातील आदर्श निवृत्त शिक्षक आदिनाथ काशिनाथ अभंग (वय 74 )यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते पंचायत समितीचे दुसरे सभापती स्व .काशिनाथ अभंग यांचे जेष्ठ चिरंजीव होते .ते काही काळ छत्रपती शिवाजी महाविद्यालयात मुख्याध्यापक होते . याच महाविद्यालयात सचिव म्हणून काम पाहत होते . व सध्या ते सोलापुर जिल्हा पतसंस्थेचे संचालक होते.


त्यांच्या अगोदरच 4 दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी मंगल (वय 69 ) यांचेही दुःखद निधन झाले होते .त्यांच्या जाण्याने कोर्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा डॉ .महेश अभंग हे आयुर्वेदाचार्य आहेत तर दुसरा मुलगा हा अनुप अभंग हे पुणे येथे वकील आहेत व दोन मुली अश्विनी व मीनल या विवाहित आहेत.

त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
 
close