Date: 28 May 2021
धरणारी कास माणुसकीची, एक जात पाहिजे,
सर्व माणसे समाजातली, बस त्यात पाहिजे,
टिपूर चांदण्यांची सर्वांना, ती रात पाहिजे,
असलेली आत ओलावा,पणतीला वात पाहिजे,
हसणारे न रूसणारे, गणगोत पाहिजे,
येते फुलत प्रेमभावना,ती मनात पाहिजे,
धडे माणुसकीचे गुन्हेगारांना, ज्ञात पाहिजे,
येणारा पुढे मदतीसाठी,प्रत्येक हात पाहिजे,
येती संकटे सज्जनांवर, तेव्हा साथ पाहिजे,
वागणूक ही तुमची, पुरी हयात पाहिजे...
रचना: दीपक महाले,
शिरुर कासार, जि.बीड.
मो.9823384909.

