shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंगेश ( बाबा) पाटील यांच्या स्मरणार्थ महतीनगरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण

मंगेश ( बाबा) पाटील यांच्या स्मरणार्थ महतीनगरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
 इंदापूर शहरात महतीनगरमध्ये मंगेश ( बाबा) पाटील यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण प्रसंगी हर्षवर्धन पाटील.

इंदापूर:प्रतिनिधी :
          इंदापूर शहरातील महतीनगर भागातील नागरिक आणि कै.मंगेश पाटील मित्र परिवार मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने कै. मंगेश( बाबा) पाटील यांच्या स्मरणार्थ राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.22) वृक्षारोपण तसेच ट्री गार्ड बसविण्यात आले. लिंब,पिंपळ,वड इत्यादी प्रकारच्या 101 रोपांचे यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
                  इंदापूर दूधगंगाचे चेअरमन मंगेश (बाबा ) पाटील यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. मंगेश (बाबा) पाटील यांचा मित्रपरिवार मोठा असून या मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ महितीनगर या ठिकाणी वृक्षारोपण व ट्री गार्ड बसविण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंगेश पाटील यांच्या कार्याची तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असणारे विविध पैलू याविषयी त्यांच्या मित्रपरिवाराने उजाळा दिला. मंगेशबाबा नेहमी सर्वांशी मिळून मिसळून आनंदाने हसत खेळत राहत. याप्रसंगी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
    कोरोना पार्श्वभूमीवर ऑक्सीजनयुक्त झाडांची असणारी आवश्यकता लक्षात घेता तसेच कै. मंगेश ( बाबा )पाटील यांच्या स्मृती कायम आठवणीत राहण्याच्या उद्देशाने महतीनगर परिसरात हे वृक्षारोपण केल्याचे माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे यांनी यावेळी सांगितले.
           यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव  मुकुंद शहा,  हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, नगरसेवक कैलास कदम, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, जे.के. शिंदे, माजी नगरसेवक शेखर पाटील, शेटे सर,प्रा. दत्तात्रेय गोळे, ॲड.जालिंदर बसळे,प्रा. सुनील सावंत,आप्पा राऊत, बनकर सर, ॲड. विकास देवकर,योगगुरु दत्तात्रेय अनपट,सुरेश मेहर, दिलीप कोरटकर, फरतडे साहेब,  शेखर गानबोटे, मिलिंद शहा,  धीरज गायकवाड, हमीद आतार, सत्यवान थोरात, पवन धुमाळ, हेमाडे सर, झगडे सर, डॉ शिवाजी वीर, बिबीशन पवार तसेच इंदापूर शहरातील मान्यवर उपस्थित होते.
________________________________

close