shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विपश्यना साधनेची रुग्णांसाठी दिली माहिती ... श्री .किसन कांबळे

प्रतिनिधी संजय वायकर

रावगाव : (दि.२९) : सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी श्री . अनिल कारंडे साहेब यांच्या आदेशानुसार कोरोना बाधित रुग्णांना मानसिक आधार देण्याकरिता आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी कोरोना रुग्णांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी विपश्यना गरजेचे आहे.

याच प्रेरणेने जेऊरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री .किसन कांबळे आणि श्री . शिवाजी लोंढे यांनी रावगाव येथील कोविड केअर सेंटर येथे विपश्यना ध्यानधारणा साधना सुरू करण्यासाठी भेट दिली .

 येथील कोविड सेंटरची काळजी घेणारे प्रशांत शिंदे सर यांना आणि  गावकरी व सहकारी मंडळींना विपश्यना संदर्भात माहिती दिली .

 शिवाजी लोंढे सर व किसन कांबळे सर यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सुमारे बारा सदस्य यांना विपश्यना कशी करायची आणि ही साधना कशी साधायची याची माहिती प्रात्यक्षिकासह त्यांच्या समोर सादर केली . कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

सदरील विपश्यना साधने नंतर गावकऱ्यांनी झाडांचे रोप भेट देऊन  कृतज्ञता व्यक्त केली.

 यावेळी गावचे सरपंच भास्कर पवार , बापु पाटील , पो.पाटील, संदिप पवार, रामभाऊ शिंदे ,प्रशांत शिंदे ,बप्पा शिंदे ,लक्ष्मण रासकर आदि उपस्थित होते.
close