shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेणाऱ्या तीन डॉक्टरांना पोलीस कोठडी....!

पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तीन डॉक्टरांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पदमजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (3) उल्हास जगताप (वय 55, रा. सुखवानी उद्यान, लिंक रोड, चिंचवड) यांनी रविवारी (दि. 2) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 19 एप्रिलमध्ये सुरेखा वाबळे यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना वाल्हेकरवाडी येथील ऑक्सिकेअर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अन्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी इतरत्र शोधाशोध सुरु केली. त्या दरम्यान बालाजी मोरे यांनी ओळखीचे डॉ. सचिन कसबे याच्याशी संपर्क साधून आयुसी बेडसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर डॉ. कसबे याने पद्मजा हॉस्पिटल, वाल्हेकरवाडी येथील डॉ. शशांक राळे यांच्या मार्फत कोविड सेंटरच्या डॉ. प्रविण जाधव याच्याशी संपर्क केला. मात्र, कोणतीही प्रक्रिया पार न करता महापालिकेच्या ऑटोक्लस्टर येथे बेड उपलब्ध झाल्याचे सांगून रुग्णास तेथे बोलावून घेतले. त्यानुसार डॉ. कसबे याने मध्यस्थी राहूल काळे या व्यक्तीमार्फत एक लाख रुपये पद्मजा रुग्णालयसमोर घेतले.

याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्या तिघांवर खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 मे रोजी आरोपींना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना 6 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
close