shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात सुजाताभाभी पवारांची दमदार कामगिरी..!!



प्रतिनिधी  I स्नेहा उत्तम मडावी:-
शिरूर:- हवेलीचे लोकप्रिय तथा कार्यसम्राट आमदार, सन्मा.ॲड्.अशोकबापू पवार यांच्या नेतृत्वाखाली पु.जि.प.सदस्या,सौ.सुजाताभाभी पवार यांनी युद्धपातळीवर एकापाठोपाठ मांडवगण फराटा, उरळगांव, तळेगांव ढमढेरे, वाजेवाडी अशा चार ठिकाणी सुसज्ज अशी कोविड केअर सेंटर उभारली. 

त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. परस्थिती हाताबाहेर जाण्याच्याआधीच भाभींनी कोविड केअर सेंटर उभारण्याच्या कामाला गती दिली. आणि बघता बघता एक-दोन नाही तर सुसज्ज अशी चार कोविड केअर सेंटर उभारली. अशा महाभंयकर परस्थितीत अनेक अडचणी उभ्या राहतात. पण त्याची तमा आणि फिकिरही बाळगली नाही. 

आज महाभयंकर परस्थिती आहे म्हणून नाही. तर पहिल्यापासूनच बापू आणि भाभी हे सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यांनी अनेकांचे जीव वाचविले. अनेक कुटुंब उद्वस्त होण्यापासून वाचविली. 
अनेकांना उभं राहण्याची ताकद दिली. तर अनेकांमध्ये जगण्याची उमेद निर्माण केली.

संकट काळात बापू आणि भाभी हे दोघेही क्षणभर सुद्धा विश्रांती घेत नाहीत. पायाला भिंगरी लावूनच काम करत असतात. सामान्य जनतेची हेळसांड होऊ नये. याची सुद्धा ते खबरदारी घेत असतात. भाभींच्या विशेष प्रयत्नातून आणि पुढाकारातून जी कोविड केअर सेंटर उभी राहिली आहेत, ती सामान्य जनतेसाठी वरदान ठरत आहेत. हे मात्र नक्की !
close