करमाळा (दि .१९ ) : सध्या सर्वत्र कोरोना रोगाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत त्यामुळे हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत . तरीही नागरिक विनाकारण सर्वत्र फिरताना आढळून येत आहेत शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त आहे.
कोणताही नागरिक विनाकरण व अनावश्यक काम करताना आढळून आल्यास त्याच्यावर ५० ० / रु दंड करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत . त्याच बरोबर अनावश्यक कामासाठी फिर ताना वापरलेले वाहन जप्त करून लॉक डाऊन संपेपर्यंत ताब्यात घेण्याचे आदेश श्री शंभरकर यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत .
यामुळे आतातरी नागरिक घरातून बाहेर पडणार नाहीत.
आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदतच होईल. या आदेशामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

