shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज चे माजी सरपंच शामराव मस्के यांचे निधन..!!



प्रकाश मुंडे ।बीड जिल्हा प्रतिनिधी:- 

केज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शामराव तुळशीराम मस्के वय ( ८५ )  वर्षे यांचे अल्पशा आजाराने दि २२ मे रोजी दुपारी  २. ४५ वा  निधन झाले . १९९२ साली केज या तालुक्याच्या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता . गावच्या विकासासाठी व समृद्धी साठी सातत्याने प्रयत्नशील असणारे व सर्वांमध्ये  मिळून मिसळून राहुण हसत खेळत बोलणारे सरपंच म्हणून त्यांची शहराला ओळख होती  . त्यांच्या निधनाने केज शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे . 


त्यांच्या पश्चात्य पत्नी जनाबाई  पाच मुले अरुण , पोपटराव, भिमराव , भैय्यासाहेब  व अविनाश ही मुले व दोन मुली सुषमा व बबिता तसेच सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.
close