प्रतिनिधी । सुर्यकांत होनप :
करमाळा । दिनांक : २१/५/२१
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना गोपनीय माहिती मिळाली की करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा,घरफोडी, जबरी चोरी मधील फरारी आरोपी कोंढेज गावात आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोकणे यांनी लागलीच पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष देवकर, कॉन्स्टेबल तोफिक काझी, चंद्रकांत ढवळे, हनुमंत गवळी यांचे पथक कोंढेज गावात रवाना केले.
वरील पथकाने कोंढेज गावात सापळा रचून करमाळा पोलीस ठाणे कडील दरोडा घरफोडी जबरी चोरी मधील फरारी आरोपी बतुल्या उर्फ संदीप जिगऱ्या
काळे राहणार दहिगाव तालुका करमाळा याला अटक केली.
सदर आरोपी वर करमाळा पोलीस ठाणे भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर 897/2020 भादवि कलम 392,452 प्रमाणे गुन्हा दाखल असून करमाळा ,टेंभुर्णी, पंढरपूर तालुका,कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आज पर्यंत दरोडा ,घरफोडी,जबरी चोरी, दरोड्याची पूर्वतयारी यासारखे नऊ गुन्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मॅडम तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विशाल हिरे साहेब,पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणे कडील डीबी पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे करत आहेत.

