प्रति,
मा.मुख्यमंत्री ,
महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय , मुंबई
विषय : बँक, फायनान्स कंपन्या , प्राइवेट फायनान्स कंपन्या व गृहकर्ज , वाहन कर्ज , मोबाईल कर्ज , इतर कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यानी त्यांचे हप्ते पुढील दोन - तीन माहिन्यापर्यन्त EMI / हप्ते पुढे ढकलावे व चेक बाउन्स चा दंड , हप्त्याचा दंड वसूल न करण्याबाबत......!
महोदय,
राज्यात कोरोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉक डाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम काही नागरिकांच्या" कामावर , पगारावर होणार आहे.
तसेच काही नागरिक तर असे ही आहेत की ज्यांच्या घरी कामावर गेल्या शिवाय जेवायला सुद्धा भेटत नाही आणि ओटो रिक्षा बंद असल्याने ओटो रिक्षा वाल्यांचे पण हाल होत आहे या महिन्यात कमाई खूपच कमी झाली आहे. त्यामुळे गाडीचे हप्ते, बँकेचे हप्ते, सोसायटी चे हप्ते भरणे या दोन - तिन महिन्यामध्ये शक्य होताना दिसत नाही.
तरी आपण पुढील दोन - तीन माहिन्यापर्यन्त EMI / हप्ते पुढे ढकलावे व चेक बाउन्स चा दंड , हप्त्याचा दंड वसूल करू नये असे संबंधितांना आपणाकडून आदेश व्हावेत , ही सर्व गरिब कामगार , मजदूर , ओटो रिक्षा वाल्यांन कडुन सरकार ला कळकळी ची विनंती आहे
आपला गरिब नागरिक,
जास्तीत जास्त शेयर करा हे पत्र मुख्यमंत्री साहेबांन पर्यन्त पोहोचले पाहिजे.

