shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ब्रेकिंग न्यूज..! पुणे जिल्हात उरवडे येथे रासायनिक कंपनीला भीषण आग; 17 कामगार बेपत्ता, सात मृतदेह सापडले..!


पुणे:- मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीत भीषण आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 7) दुपारी घडली. या आगीत 17 कामगार बेपत्ता झाले असून सात कामगारांचे मृतदेह सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस ही रासायनिक कंपनी आहे. या कंपनीत सोमवारी 37 कामगार काम करत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक कंपनीत आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. काम करत असलेल्या 37 कामगारांपैकी 17 कामगार बेपत्ता झाले.

अग्निशमन विभागाला माहिती मिळताच पीएमआरडीएचे सहा आणि एमआयडीसीचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे. दरम्यान सात मृतदेह बाहेर काढण्यात आले असून घटनेत 15 कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

कंपनीत अडकलेल्या कामगारांमध्ये काही महिला कामगार देखील आहेत. आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे.
close