कोपरगाव । प्रतिनिधी (विशाल लोंढे):
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका संघटक व जेऊर कुंभारी गावचे सुपुत्र प्रा.मधुकर वक्ते सर यांना अखिल भारतीय पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार देवुन गौरवण्यात आले आहे.
कोरोना विषाणुच्या पाश्र्वभुमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन काळात प्रशासनाने सर्व क्रार्यक्रमांवर बंदी घातल्याने प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांचे हस्ते ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
प्रा.मधुकर वक्ते सर यांनी कोरोना काळात अनेक सामाजिक उपक्रमात आपले योगदान दिले असुन या अगोदर ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था कोपरगाव. व कोरोना नियंत्रण समिती कोपरगाव यांच्या वतीने प्रा. मधुकर वक्ते यांना कोरोना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कोरोना योध्दा पुरस्कार मिळाल्याबद्दल जेऊर कुंभारी तसेच चांदेकसारे,डाऊच, पंचक्रोशोतील नागरीकांनी प्रा.मधुकर वक्ते सर यांचे अभिनंदन केले आहे.

