शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराचे अध्यक्ष श्री. योगेश गोंदकर यांच्या संकल्पनेतून युवा मोर्चाच्या वतीने कोरोनाच्या कठीण काळामध्ये आपला जीव धोक्यात घालुन कोविड रुग्णाची सेवा रुग्णवाहिका चालक म्हणुन कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाच्या सन्मानार्थ २५ रुग्णवाहिका चालकांना २,००,०००/-(दोन लाख) रुपयेचा अपघाती विमा व ५०,०००/- रूपयेचा मेडिक्लेम विमापत्र खा.मा.श्री.सुजय दादा विखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र भाऊ गोंदकर यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आला. यावेळी खा.सुजय दादा विखे यांनी युवा मोर्च्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी नगराध्यक्ष श्री. शिवाजी भाऊ गोंदकर, जिल्हाउपाध्यक्ष श्री.अशोक भाऊ पवार, तालुका अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर आबा, शहराध्यक्ष श्री.सचिनजी शिंदे, श्री.रवि तात्या गोंदकर, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य श्री.किरण बोराडे, सचिव श्री.सोमराज कावळे, तालुका अध्यक्ष श्री.सतिष बावके यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी युवा मोर्चा शिरडी शहरचे उपाध्यक्ष प्रसाद शेलार, सचिन घुले, अमोल कोते, विकास गोंदकर, प्रशांत थोरात, विनोद गोंदकर, गणेश सोनवणे, नितीन घुले, अक्षय मुळे, महेश सुपेकर, सागर जाधव, प्रवीण भोईर, विशाल पवार, राहुल घुले, पंकज फरताळे, सागर भोईर, ऋषिकेश कोंडीलकर, सागर बेलदार, साहिल बेलदार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री.योगेश गोंदकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री.अक्षय मुळे व आभार प्रदर्शन श्री.प्रसाद शेलार यांनी केले आहे.

