shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गाळेधारकांचे अनाकलनीय गौडबंगाल..!!



प्रतिनिधी :संजय वायकर
जळगाव :(दि .२३)  जळगाव महानगरपालिकेचे १९ शॉपिंग कॉम्लेक्सचे गाळेधारक टांगणीवर आहेत.२०१२ पासून मनपा आणि दुकानदार यांचा करार संपलेला आहे. सतत ८ वर्षे हा प्रश्न का लोंबकळत आहे?याचे गमक जळगाव मधील सिंडेकेटच्या हाती आहे.
    

याची कारणे नैतिक व राजकीय  स्तरावर अभ्यासली पाहिजे.मुळचे फुले  भाजी मार्केटमध्ये तीनमंजली दुकाने बांधून मनपाने भाड्याने दिलीत.३०वर्षाचा करार होता.भाडे ठरले.करार ठरला .म्हणजे मनपा व भाडेकरू दुकानदार यांना तो मान्य होता.३०वर्षे कराराप्रमाणे दुकाने वापरलीत.मनपाला रीतसर भाडे मिळत गेले .तो करार २०१२मधे संपला.म्हणजे व्यापाऱ्यांनी दुकान खाली करून मनपाला परत केले पाहिजे. आम्ही ३० वर्षे वापरले.तुम्ही वापरू दिले.आमचा तुमचा करार संपला.तुमचे दुकान तुमच्याकडे,आमचा माल आमच्याकडे. वाद  आहे कुठे ? कोर्टकचेरी तरी का करावी?
    

येथे आमची नितीमत्ता बिघडली.भाड्याने घेतलेले दुकान बळकावण्याची.भाड्याने घेतलेले घर बळकावण्याची. हे पुर्णतः अनैतिक आहे.
     
दुसरा स्तर असा कि गाळेधारक भाजपचे मतदार आहेत.वाजपेयी, आडवाणी, मोदी,फडणवीस,महाजन,सोनवणे  यांचे सगेसोयरे आहेत.त्यांनी लोकसभेत, विधानसभेत, महानगरपालिकेत भाजप ला  एकगठ्ठा मतदान केले.म्हणजे केंद्रात सत्ता भाजपची.राज्यात सत्ता भाजपची.मनपात सत्ता भाजपची.तर मग दुकानांचा  करार रिन्युयल का केला नाही?चीन,पाकिस्तान ,अमेरिकेने विरोध केला होता काय?यासाठी सीआयडी,सीबीआय, सीआईए,केजीबी ची गरज नाही.करार करून  एका दुकानाचे मनपा ५०० रूपये भाडे घेत असेल तर  करार न करता त्याच दुकानाचे भाडे ५००० रुपये सिंडीकेट टोळी घेते.तसे देणे दुकानदाराला परवडते आणि राजकीय चोरांना लाभाचे असते.म्हणून मनपा,राज्य, केंद्र या तिनही स्तरावर भाजपची सत्ता असूनही या दुकानांचा करार रिन्यू केला नाही.मनपाचे वैध उत्पन्न अवैध करून लाटण्याचा हा प्रकार आहे.यासाठीच ५० लाख खर्च करून एक नगरसेवक निवडून आणतात.३०कोटी खर्च करून एक आमदार निवडून आणतात.निवडणूक खर्च म्हणजे राजकीय गुंतवणूक आहे.कोणत्याही सिलीकॉन किंवा अम्युनेशन फैक्टरी पेक्षा येथे जास्त डिव्हीडंट मिळतो.
      
जळगाव येथील गाळेधारकांचे नेतृत्व डॉ शांताराम सोनवणे करीत आहेत.त्यांचेच पुत्र आश्विन  सोनवणे मनपात उपमहापौर होते.तेंव्हासुद्धा भाडेकरार रिन्यू करण्याचा प्रयत्न केला नाही. का?तसे केले असते तर आज असे आंदोलन करण्याची संधी  मिळाली नसती.समस्या जारी रहनी चाहिये.वार मस्ट गो ऑन.
      
जळगाव मनपात भाजपची निर्विवाद सत्ता होती.तेंव्हा गाळेधारकांचे एकही आंदोलन झाले नाही. केले असते तर अकबर विरूद्ध सलीम ,असा मुगलेआझम  झाला असता.किंवा भाडेकरार रिन्यू करून हा प्रश्न मिटला असता.पण हा मिटवायचाच नाही, याच उद्देशाने हा गोंधळ चालू आहे.आश्चर्य म्हणजे,भाजपचे आमदार मा.सुरेश भोळे हे  शहराचे असतानाच श्रीमती भोळे महापौर होत्या.मनपाच्या सर्वच चाव्या आपल्याच कमरेत असतांना आपण तेंव्हा कमर कसली नाही. तेच आमदार महोदय सुद्धा कलेक्टर ऑफिस समोर हजेरी देऊन रडून आले. अश्रू गाळून आले.मंडप भिजवून आले.
      
आता मनपात शिवसेनेची सत्ता आहे.राज्यात ही शिवसेनेचे नगरविकास मंत्री आहेत.येथे गाळेधारकाचा हा आक्रोश चालू आहे.शिवसेना हा प्रश्न फुकट सोडवणार नाहीत. ते तर त्यांचे धोरण आहे. यहां आता है उनकी मर्जीसे. जाता है हमारी मर्जीसे !! हा आक्रोश, हे आंदोलन प्रश्न सोडवण्यासाठी नसावे, असे वाटते.तर मग चालू ठेवायचे  कशासाठी? अगर इशारोको  तुम समझो,राज को राज रहने दो ! हम सवालोको मिटाते नही.सवालोपर सवालोको मंजील खडी करते है! 
     
गाळेधारकांचा प्रश्न असाच तहीयात लोंबकळत ठेवायचा आहे.ते राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन आहे.अनाकलनीय गौडबंगाल आहे.

...शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.
close