नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर सोलापूर रस्त्यावरील शिराढोण गावातील सिना नदी पुलावर गुरुवार(दि.३) रोजी दुपारच्या ४. सुमारास खड्डे चुकवण्याच्या नादातील दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली यांत गुजरात पासिंग जी.ए ०५ जी. एफ ९९५३ चारचाकी वाहन ईको गाडी
करमाळ्याच्या दिशेने चालेली असताना त्यावेळीच
आणि विना नंबर प्लेट स्विफ्ट गाडी नगरच्या दिशेने जात असताना या दोन्ही वाहनाची समोरा समोर धडक झाल्याने या अपघातात राजेंद्र बन्सीलाल पाटील (वय ३९) यांचा डोक्याला मार लागल्याने त्यांचा यांत जागीच मृत्यू झाला.
या वेळी शिराढोण ग्रामस्थांनी अपघातग्रस्त व्यक्तीनां मदत करत शासकीय १०८ नंबर रुग्णवाहिकेला संपर्क करुन सदर घटना कळवली. घटनास्थळी १०८ नंबर रुग्णवाहिकेच्या डॉक्टर तपासणी केली असता सदर व्यक्ती मयत झाल्याचे उपस्थित नागरिकांना सांगितले. ईतर जखमी व्यक्ती ना खाजगी हाॅस्पिटल दाखल करण्यात आले. घटनास्थळी नगर तालुका पोलिसांत दाखल झाले होते. घटनास्थळी पंचनामा व पुढील तपास पोलिस कर्मचारी जयश्री फुंदे व भगवान गांगर्डे करत आहे.

