shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल येथे पद्मालय फाट्यानजिक नविन गो-शाळेचा शुभारंभ..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
एरंडोल येथे पद्मालय फाट्यानजिक मरीआई ट्रस्ट तर्फे नविन गो-शाळेचा उद्घाटन समारंभ रविवारी संपन्न झाला.  नगराध्यक्ष रमेश परदेशी यांचे हस्ते फित कापून व नारळ वाढवून गो-शाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मरीआई फाऊँडेशन चे अध्यक्ष यशवंत बुंदेले यांनी प्रमुख पाहूण्यांचे स्वागत केले.माजी नगरसेवक जगदीश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी ओ.बी.सी.सेल मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी,नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे,पञकार कुंदनसिंह ठाकूर,ट्री-फाऊँडेशनचे संजय शिंदे,भानूदास आरखे,ग्राहक कल्याण फाऊँडेशन च्या अध्यक्षा आरती ठाकुर,वैशाली व रश्मी बुंदेले आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन शेखर बुंदेले यांनी केले.
close