shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धन धन बाबा धन्ना जी जयंती निमित्त गुरुद्वारा लोहगड साहीब येथे "सालाना जोड मेला" कार्यक्रमाचे आयोजन..!

धन धन बाबा धन्ना जी जयंती निमित्त गुरुद्वारा लोहगड साहीब येथे  "सालाना जोड मेला"  कार्यक्रमाचे आयोजन..!

लोहा( प्रतिनिधी):  लोहा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गुरुद्वारा श्री लोहगड साहीब कारेगाव येथे दिनांक 15 जून रोजी धन धन बाबा धन्ना  जी यांच्या जयंतीनिमित्त सालाना जोड मेला कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास गुरुद्वारा लंगर साहीब नांदेड चे महंत संत बाबा नरेंद्र सिंग जी, संत बाबा बलविंदर सिंग जी ,संच खंड गुरुद्वारा चे पंच प्यारे साहेब प्रमुख उपस्थित राहणार असून या सालाना जोड मेला कार्यक्रमात कीर्तन, कथा, सचखंड साहिब चे पंचप्यारे हजेरी भरणार आहेत. 

यावेळी  लोहगड साहिब येथील गुरुचे लंगर सर्व भाविक भक्तांसाठी खुले राहणार आहे , सालाना जोड मेला हा कार्यक्रम गुरुद्वारा लोहगड साहीब येथे मोठ्या उत्साहात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार असून लोहा, कंधार तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी सालाना जोड मेला या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे  आवाहन गुरुद्वारा लोहगड साहीब चे प्रमुख पुजारी बाबा प्रीत पाल सिंह यांनी केले आहे.
close