shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्मयोगी कारखाना साईटवर वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्मयोगी कारखाना साईटवर वृक्षारोपण
  इंदापूर प्रतिनिधी:कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. बिजवडी कारखान्याच्या परिसरामध्ये जागतिक पर्यावरण दिन ५ जूनच्या निमित्ताने  कारखान्याचे  चेअरमन व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी  हर्षवर्धनजी पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 

   पर्यावरणाचा समतोल राहणेच्या दृष्टिकोनातून  हर्षवर्धनजी पाटील व श्रीमती पदमाताई भोसले यांचे संकल्पनेतून कारखाना साईटवर मागील काही वर्षापासून मोठया प्रमाणात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दिवसेंदिवस प्रदुषणाची पातळी वाढत चालल्याने व सध्याची कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ख-या अर्थाने ऑक्सिजनची उपलब्धता याबाबतची सर्वांनाच प्रकर्षाने उणीव भासली. याकरिता व्यवस्थापनाचे सुचनेनुसार वृक्षारोपण केलेल्या ७४५१ जंगली झाडांचे संवर्धन कारखाना चांगल्या पध्दतीने करीत आहे. यावर्षी अजून १५०० ऑक्सिजन पुरवठा जास्त करणारी झाडे लावण्याचा व त्याची निगा राखणेचा संकल्प आहे. कारखाना कार्यक्षेञातील सभासदांनी एक व्यक्ती एक झाड याप्रमाणे वृक्षरोपण करण्याचे आवाहनही यावेळी कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले.
  यावेळी कारखान्याचे संचालक यशवंत वाघ, अंबादास शिंगाडे,सुभाष काळे, मच्छिंद्र अभंग, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, सर्व अधिकारी, खातेप्रमुख या कार्यक्रमास उपस्थित होते.
close