सारोळाबद्दी । प्रतिनिधी(आसावरी वायकर):-
गाव तिथे लसीकरण मोहिमेअंतर्गत नगर तालुक्यातील सारोळाबद्दी येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांच्या नियोजनातून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण कॅम्प व रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प घेण्यात आला.
या कॅम्पचे उद्घाटन जि.प.सदस्य संदेशजी कार्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी सरपंच सचिन लांडगे,शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश बोरुडे,CHO डॉ.सांगळे मॅडम,उपसरपंच अर्जून हजारे,महेश बोरुडे,ग्रा.प.सदस्य अशोक लांडगे,रंगनाथ शिर्के,जयदीप बोरुडे,प्रदिप डहाणे,ईश्वर बोरुडे,आरोग्य सेवक पोपट लिपणे,आरोग्य सेविका सरोजिनी देठे,सुनिता बिडवे,ग्रामसेवक एकशिंगे भाऊसाहेब,कानिफ ससे मुख्याध्यापक साठे सर,आशा सेविका नंदा बोरुडे,अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग व पंचायत समितीचे आरोग्य विभाग कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

