संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप):-
पारेगाव येथे विजेची तार पडून ६, गायांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ वाटत आहे.
यामध्ये फकीरा राधु गडाख, रा. पारेगाव गडाख येथील हा शेतकरी या शेतकऱ्याच्या ६ गायींवर विजेची तार पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. महावितरणची तार गोठ्याच्या जवळून गेली होती. पावसाळा सुरू होताच अशी घटना घडली आहे .
अशी घटना अजून घडू नये म्हणून महावितरणने सगळीकडे प्राधान्य पुर्वक लक्ष द्यावे अशी स्थानिक लोकांची मागणी होत आहे , तर ,फकीर राधू गडाख , या शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आता याची भरपाई कोण देणार ..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. हा शेतकरी मात्र आता संतापलेला आहे व तो आपल्या नुकसानभरपाईची मागणी करत आहे...!
तरी शासनाने अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडे वेळीच लक्ष दिले तर त्यांना दिलासा मिळू शकतो. अशी अपेक्षा सर्व सामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.

