shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर बस स्थानकात शॉर्टसर्किटने बसला आग, वेळीच आग नियंत्रणात

इंदापूर बस स्थानकात शॉर्टसर्किटने बसला आग, वेळीच  आग नियंत्रणात.
इंदापूर:इंदापूर बसस्थानकात अचानक एका बसने शार्टसर्किटने पेट घेतला पाहता क्षणी स्थानकात मोठा धूर पसरला  नागरिक भयभीत झाले. मात्र  आग नियंत्रणात आणल्याने  मोठी दुर्घटना टळली. 

एम.एच.14 बीटी 1237  बस फलटा क्र. 06 वर शुक्रवारी दि.18 रोजी दुपारी पावणेदोन वाजता दाखल झाली. चालक पोळ आर.बी. हे अकलूज फेरी करुन आले होते.त्यानंतर चालक एस.एन.कदम हे सदरची बस घेऊन 2 वाजता इंदापूर अकलूज ला जाण्यास निघाले,गाडीत काही प्रवासी ही बसले होते.  बस चालू करण्याचा प्रयत्न करताच बॅटरी च्या पेटी मधून  अचानक  धूर बाहेर पडला. त्यानंतर या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पडू लागण्याने चालकाने प्रसंगावधानी मुख्य स्वीच बंद केला,व गाडीतील प्रवासी तातडीने बाहेर काढले. 

गाडीतच अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित असल्याने चालक कदम यांनी त्वरीत त्याचा वापर केला. सोबत मदतीला बसस्थानकातील गाळेधारक ही धावून आले. पाण्याचा फवारा बॅटरी बॉक्स वर फवारणी करुन ही आग नियंत्रणात आनण्यात आली. घटना समजताच आगारप्रमुख महेबुब मणेर,सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक प्रकाश शेलार, वरिष्ठ कार्यशाळा कर्मचारी नवनाथ जगताप, प्रशांत वाघमारे या ठिकाणी दाखल झाले. 

ही आग नियंत्रणात आणन्यासाठी विजय फरतडे, नानासाहेब मारकड,दशरथ तोरसकर,कमलाकर लांडगे भिकन जाधव,आदी एस कर्मचारी व आप्पा पारेकर, अतुल बनसुडे,सचिन ओव्हाळ,किशोर घोलप,आष्कर शेख,गणेश कांबळे,सुरज सुपेकर,हनुमंत माने आदींनी प्रसंगावधान दाखवून मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली.
close