शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन ) :
शिर्डीच्या आस्थपनेवरील विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवून सेवानिवृत्त होणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांच्या सत्कार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सेवानिवृत्ती कार्यक्रमास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने आस्थापनेवरील माहे मे २०२१ मध्ये विहित वयोमान (६० वर्षे) पुर्ण होवुन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांमध्ये बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, संरक्षण विभागाचे मुकादम संजय पाटणी, मंदिर विभागाचे मुकुंद कापरे, श्री साईनाथ रुग्णालयाच्या लॅब टेक्नीशियन श्रीमती लिली विद्यातील यांच्यासह विविध विभागांचे एकुण २१ कर्मचा यांचा समावेश आहे.
संस्थानच्या वतीने या सर्व कर्मचाऱ्यांच्या संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बगाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थानचे मुख्य कार्यकारी कान्हूराज बगाटे म्हणाले, आज २१ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने संस्थानमध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज श्री साईबाबा संस्थानची गणना देशात क्रमांक ०२ ची आहे. या प्रगतीच्या प्रवासात या सेवानिवृत्त कर्मचा यांची नोंद उल्लेखनीय आहे. हे काम करत असताना या कर्मचा यांचे नावे कोनशिलेवर कधी लागले नाही, परंतु त्यांनी केलेले काम नक्कीच उल्लेखीन असून संस्थानच्या नावलौकीकात त्यांचे मोठे योगदान आहे.
या सर्व कर्मचा-यांच्या कामाचा आदर्श पुढील पिढीने घेवा व यापुढची वाटचाल करावी, असे सांगुन या सेवानिवृत्त कर्मचा-यांनी अनेक वर्ष या ठिकाणी कर्तव्याचे पालन करुन उत्तम सेवा केली त्याबद्दल कान्हूराज बगाटे यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांची भाषणे झाले. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विकास शिवगजे यांनी केले.

