shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"पर्यावरण जनजागरण"..! 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! पक्षिणी सुस्वरे आळवीती'..!!


जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून राष्ट्रातील वने उपवने आणि उद्याने यातील वृक्ष आणि वेली यांचं महत्त्व काय आहे हे सांगताना पक्षिणीच्या स्वरांची मदत घेतलेली आहे. 

याचा भावार्थ लक्षात घेतला तर हे समजून येते की पक्षिणी हे सजीवतेचे लक्षण आहे. झाडांवर घरटे बांधणारा तो पक्षी! म्हणून झाडांच्या पानाफुलांमध्ये यांचा संसार फुलतो.  जेथे झाडे विपूल असतात, त्यांना फळे विपुल असतात तेव्हा तेथे पक्ष्यांच्या विविध जनजाती तयार होतात. पक्षी परागीभवनाचे काम देखील करतात .अनेक वृक्षांची रोपे ही पक्ष्यांनी खाल्लेल्या फळांच्या बी मधून रुजतात. आज विश्वामध्ये दररोज घटत असलेले जंगलाचे प्रमाण लक्षात घेता आपल्याला सहजतेने भविष्यकाळात ऑक्सिजन मिळेल काय याची चर्चा चाललेली आहे.

केवळ एकमेव अशी यंत्रणा आहे की जी मानवजातीला कायमस्वरूपी विपुल प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा करू शकेल आणि ती यंत्रणा म्हणजे वृक्ष. वृक्ष हेच आपले पालनहार आहेत.

वनराई आणि वन्यजीव, पशूपक्षी यांचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. पक्षिणी वनराईचे महत्त्व सांगताना सोयरे या अर्थाने म्हणते. सोयरे याचा अर्थ अत्यंत जवळचे नातेवाईक. दोन कुटूंबाना एकत्र आणणारं नातं. वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे. 
संत वांड़मयाचे  विज्ञाननिष्ठ निरुपणकार. 

(कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान)
close