झगडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने बापूसाहेब बोराटे यांचा नागरी सत्कार इंदापूर प्रतिनिधी:माळी सेवा संघ म्हणून संपूर्ण राज्यात अग्रेसर असणारी माळी समाज्याची संघटना आहे. याच संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष मा श्री बापुसाहेब बोराटे हे इंदापूर तालुक्याचे काम पाहतात आणि आजपर्यंत त्यांनी संघटनेच्या माध्यमातून शैक्षणिक,गोरगरीब,समाज हिताची अनेक कामे करून संपूर्ण राज्यामध्ये इंदापूर तालुक्याचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
याच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इंदापूर तालुक्यामध्ये आदर्श ग्रामपंचायत मौजे झगडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने बापूसाहेब बोराटे यांचा नागरी सत्कार इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व इंदापूर तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष अतुलशेट झगडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व इंदापूर तालुका विद्युत वितरण नियंत्रण समिती चे अध्यक्ष मा श्री अतुलशेट झगडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अक्षय भैय्या माळी,माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे कायदेशीर सल्लागार ॲड. नितिन राजगुरु,झगडेवाडी चे माजी उपसरपंच व महात्मा फुले ग्रुप चे अध्यक्ष बाळासाहेब झगडे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण झगडे,डाॅ. दादाराम झगडे,माजी सरपंच सुरेश झगडे,प्रगतशील बागायतदार विजय झगडे,माळी सेवा संघ इंदापूर तालुका संघटक दादा शिंदे,तालुका सचिव संदिप बारवकर, संतोष झगडे,सोमनाथ झगडे, ग्रामस्थ व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

