shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घोडेगाव येथील विस्तारित कांदा मार्केट गळ्यांचा कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे हस्ते शुभारंभ..!!

सहकारी संस्थाची जपवणूक करत ना गडाख बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील.
कृषी मंत्री दादाजी भुसे..!!

प्रतिनिधी। मोहन शेगर, सोनई 

नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन विस्तारित 29 कांदा गळ्यांचा ना शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून बेरोजगार शेतकरी तरुणांना व्यापारी बनवणाऱ्या कांदा मार्केटचा सोम दि 28 जुन 2021 रोजी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते व नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक ना शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.याप्रसंगी बोलतांना दादाजी भुसे म्हणाले की मंत्री ना शंकरराव गडाख हे नेहमी नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी व विविध शेतीपूरक योजना राबवण्यासाठी मला भेटत असतात त्यांची सदैव त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असते.घोडेगाव सारख्या ठिकाणी ना गडाख यांनी प्रयत्नपूर्वक सुरू केलेले कांदा मार्केट आज योग्य व्यवस्थापनामुळे देशभरात प्रसिद्ध झाले आहे.राज्यात सर्वाधिक कांदा आवक घोडेगाव येथे होते आहे ही बाब नेवाश्याचा दृष्टीने अभिनंदनीय अशी आहे.

घोडेगाव ता नेवासा येथील नवीन विस्तारित कांदा मार्केटच्या कोनशिलेचे अनावरण करतांना कृषी मंत्री दादाजी भुसे व ना मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख व कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा संचालक मंडळ व कांदा लिलाव करतांना ना दादाजी भुसे व ना शंकरराव गडाख.

बेरोरजगार शेतकरी तरुणांना कांदा व्यापारी आडतदार करणारा उपक्रम कृषी क्षेत्रासाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असा आहे यातून प्रेरणा घेऊन काम करू असेही भुसे म्हणाले तसेच ना शंकरराव गडाख यांनी विविध सहकारी व कृषीपूरक संस्थाची काळजीपूर्वक जपवणूक करत बेरोजगार तरुणांना व्यवसाय उपलब्ध करून दिला त्याबद्दल ना गडाखांचे त्यांनी कौतूक केले तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाविकास आघाडीचे संपुर्ण मंत्रिमंडळ नेहमी शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी कटिबध्द आहे असेही भुसे म्हणाले.

ना दादाजी भुसे यांचे हस्ते व ना शंकरराव गडाख उपस्थितीत कोनशिलेचे अनावरण करून उदघाटन समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी मंत्री गडाख यांनीही उपस्थित कांदा आडतदार व व्यापारी यांचेशी संवाद साधत व्यवसायास शुभेच्छा दिल्या व यापुढे  व्यवसाय करतांना काहीही अडचण आली तर मदतीसाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही ना गडाख यांनी दिली.याप्रसंगी सर्व कांदा आडतदार व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत डॉ शिवाजीराव शिंदे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा यांनी केले तर आभार सचिव देवदत्त पालवे यांनी मानले.याप्रसंगी रावसाहेब खेवरे शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख,युवा नेते उदयन गडाख ,नेवासा कृषिउत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ आदी उपस्थित होते.

शुभारंभ प्रसंगी मंत्र्यांनी केला कांद्याचा लिलाव.
घोडेगाव उपाआवारातील नवीन कांदा मार्केटमधील गळ्यांच्या शुभारंभ प्रसंगी कृषी मंत्री दादाजी भुसे व मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आल्लू इमानदार या तरुण व्यापाऱ्याच्या दुकानात कांद्याचा लिलाव केला लिलाव केलेल्या कांद्याला सर्वोच्च 2400 रुपये प्रति 100 की भाव मिळाला.

कृषीमंत्र्यांनी सोनईत केली भुईमूग शेंगांची शेतकऱ्यांकडून खरेदी.

कार्यक्रमस्थळी येत असताना सोनईत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आदिनाथ दहिफळे वंजारवाडी या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये भुईमूग शेंगांची विक्री सुरू होती तेथे गाड्यांचा ताफा थांबवून ना दाजाजी भुसे यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करत भुईमूग शेंगाची खरेदी केली व स्वतः पुढाकार घेत शेतकरी विक्रेता होत आहे याचेही विशेष कौतूक केले.
close