shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल नगर पालिकेतर्फे लाभार्थ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप केल्या बद्दल बँक मॅनेजर यांचा केला सत्कार..!!

प्रतिनिधी - एरंडोल नगरपरिषदेकडील दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत शहरातील फेरीवालाकरिता राबविण्यात येत असलेल्या केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयेचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे एरंडोल शहरातील लाभार्थ्यांना वाटप केलेल्या कर्ज प्रकरणांबाबत बॅकेचे मॅनेजरांचा सत्कार कार्यक्रम म.नगराध्यक्ष यांच्या दालनात आयोजित करण्यात आला होता.यावेळी एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी , मुख्याधिकारी किरण देशमुख , सेट्रल बँकेचे मॅनेजर विश्वप्रिय जावरे,स्टेट बॅकेचे मॅनेजर आशिष मेंढे तसेच महेंद्र पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी व शहरातील पत्रकार अल्हाद जोशी,शालीग्राम गायकवाड उपस्थित होते .

    


याप्रसंगी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी सांगितले की , एरंडोल शहरातील कोरोना संचारबंदीच्या.काळात पथविक्रेतेच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योनजेच्या माध्यमातून खेळते भांडवली कर्ज बँकेमार्फत उपलब्ध केले जात आहे.योजनेतर्गत आतापर्यत नगरपरिषदेकडे एकूण ३४० अर्ज ऑनलाईन पध्दतीने आले असून त्यापैकी सेंट्रल बँक ऑफ इडिया या शाखेतील ६० अर्जाना बॅकमार्फत मंजूरी देऊन ५५ लाभ्यार्थाना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेकडे एकूण १६२ पैकी १२० लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.

close