shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोणा काळात पर्यावरणाबद्दल व्यंगचित्रातून सांगू काही प्रदर्शनात अरविंद गाडेकर यांच्या व्यंगचित्रांचा समावेश..!!

संगमनेर -५ जून जागतिक पर्यावरण दिन निमित्त  कार्टूनिस्ट कम्बाईन  व तेर पॉलीसी सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन प्रदर्शन आयोजित केले आहे.  


महाराष्ट्रभरातून या प्रदर्शनासाठी व्यंगचित्रे मागविली होती. अनेक नामवंत व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्रे पाठविली. संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी दोन व्यंगचित्रे पाठविली आणि या व्यंगचित्रांचा समावेश या प्रदर्शनात केला आहे.  चिंटू फेम चारुहास पंडित , नामवंत व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, जगदीश कुंटे , संजय मिस्त्री आणि ५० नामवंत व्यंगचित्रकारांचा या व्यंगचित्र प्रदर्शनात समावेश आहे. कोरोना परिस्थितीमुळे सदरचे प्रदर्शन ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार असून या प्रदर्शनाचे ई -बुक ही प्रकाशित होणार आहे. व्यंगचित्रकार धनराज गरड यांच्या संकल्पनेतून हे व्यंगचित्र प्रदर्शन होत असून यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. ऑक्सिजन तुटवडा कोरोना ग्रस्तांना जाणवला , अनेक प्राण गमावलेला , पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक प्रकारे हानी होत आहे आणि व्यंगचित्रातून या बाबत जनप्रबोधन व्हावे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.  या व्यंगचित्र प्रदर्शनात सहभागी उत्कृष्ट व्यंगचित्रास आकर्षक बक्षिसे , पारितोषिके दिली जाणार आहेत.
         

अरविंद गाडेकर यांनी कोरोना काळात संगमनेरी तडका या शीर्षकाखाली कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावरून अनेक व्यंगचित्रे प्रदर्शित केली असून महाराष्ट्रभरातून त्यांच्या व्यंगचित्रांना खूप प्रसिद्धीही मिळत आहेत.  अनेक साप्ताहिक , दैनिकातून अजूनही त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत आहेत. 
close