सेनगावात रास्ता रोको
सेनगाव :येथील पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची अवैध धंद्याची पाठराखण करणे व संचार बंदीचा फायदा उठवीत सर्वसामान्य व्यापाऱ्यांची आर्थिक लूट करणे या कारणावरून पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे .
त्यामुळे अवैध धंदा करणाऱ्या दारू, जुगार, मटका व गुटक्या वाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत .पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी अवैध धंदेवाल्यांची पाठराखण करीत असतानाच covid-19 मुळे लावण्यात आलेल्या संचार बंदीचा गैरफायदा उठवित अनेक छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांची आर्थिक लूट केल्याचा तक्रारीही पोलीस प्रशासनातील वरिष्ठांपर्यंत पोचल्या होत्या .या कारणाने पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची दि.७ जुन २०२१ रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे .व सेनगाव पोलिस ठाण्याचा पदभार श्रीमती दिक्षा लोकडे महिला पोलिस निरिक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे .
परंतु कृष्णदेव पाटील यांची बदली झाल्यामुळे अचानक अडचणीत आलेल्या अवैध धंदे वाल्यांनी बदली थांबवण्यासाठी येनकेन प्रकारचे प्रयत्न सुरू केले . काही राजकीय नेत्यांना तर काही सामाजिक कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांनी श्री कृष्णदेव पाटील यांची बदली थांबवण्याबाबत पोलिस अधिक्षक हिंगोली यांना निवेदने दिली .तर आज दिनांक ९ जून बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सेनगाव टी पॉईंटवर रास्ता रोको करण्यात आला .
या रास्ता रोको चे नेतृत्व नेमके कोण करीत होते याचा काहीही खुलासा झाला नाही . सेनगाव नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्याने काही नेतेमंडळी मतांचे गणित समोर ठेवून या कार्यक्रमात हलकेच दाखल होऊन निघून जाताना दिसली .एकंदरीत कुठलाही मुख्य उद्देश समोर नसल्याने रास्ता रोकोला फारसा प्रतिसाद मिळाला नाही .
परंतु काही काळ प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला . covid-19 च्या काळात गर्दी जमान्याला बंदी आहे . नागरिकांसमोर , शेतकऱ्यांसमोर महागाई , खत , बियाणांची भाववाढ ,पेट्रोल व डिझेलची भाववाढ इत्यादी महत्त्वाचे प्रश्न समोर असताना अशा परिस्थितीत पोलीस निरीक्षकांच्या समर्थकांनी मात्र कोरोणाचे सगळे नियम धाब्यावर बसवीत हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला .
याबाबत सेनगाव शहरातील व्यापारी व सर्व सामान्य नागरिकात मात्र हा रास्ता रोको बदली झालेल्या पोलिस निरिक्षक यांनीच स्वतःहून बदली थांबविल्यासाठी केलेला प्रयत्नाचा भाग असल्याची चर्चा यावेळी ऐकावयास मिळत होती.तर प्रवासी, व्यापारी वसर्वसामान्य नागरिक मात्र संताप व्यक्त करीत असल्याचे दिसून आले .

