*इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी अक्षय माळी यांची निवड*
इंदापूर प्रतिनिधी: सरडेवाडी येथील युवा नेते व माळी सेवा संघ इंदापूर तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय माळी हे राष्ट्रवादी काँग्रेस चे कट्टर कार्यकर्ते असून आजपर्यंत त्यांनी बरेच सामाजिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाढीसाठी त्यांचा खुप मोठा सिहांचा वाटा आहे.
याच त्यांच्या कामाची दखल घेऊन आज इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष चि. अक्षय भैय्या माळी यांची निवड करण्यात आली.
या वेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी चे कार्याध्यक्ष अतुलशेट झगडे,इंदापूर तालुका युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर,युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन खामगळ,संजय गांधी निराधार योजना इंदापूर तालुका अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,ग्रामपंचायत झगडेवाडी चे माजी उपसरपंच बाळासाहेब झगडे,हायकोर्ट वकील ॲड नितीन जी राजगुरु,सुहास बोराटे,शांताराम बोराटे व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

