shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वंचित ओबीसी च्या न्याय हक्का साठि नगर येथे २२ ला चिंतन बैठक...!!

अमरावती । प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करने हे फार सोपे असले तरी आता लोकांना मूर्ख बनवीने हे फार कठिन झाले आहे. ज्यांच्या भरवश्यावर महाराष्ट्रामधे हे राज्यकर्ते सत्ता हस्तगत करायचे आणि आज पर्यंत त्यांनाच सामाजिक, शैक्षिणक, आर्थिक व राजकीय दृष्टिकोनातून मागसले ठेवण्याचा शड़यंत्र आता चालणार नाही. 

बारा बलुतेदार महासंघ व प्रजा लोकशाही परिषदेच्या माध्यमातून राज्यात एक वेगळी ताकद निर्माण करण्याचे कार्य सुरु झाले आहे. ज्यांनी फक्त मतासाठी या समाजाचा वापर केला त्यांना धड़ा शिकवावा लागेल. यासाठी येत्या २२ जून २०२१ ला अहमदनगर येथे बारा बलुतेदार महासंघ व प्रजा लोकशाही परिषद महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

येत्या आगामी काळात बलुतेदार, अलुतेदार व भटके विमुक्त या समाजाच्या सामाजिक विकासाकरिता नवीन धोरण आखून या समाजाला न्याय मिळवून देण्याची तयारी या सर्व नेते मंडळी ने केली आहे. ओबीसी नेते कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या बैठकीला राज्यातिल बलुतेदार, अलुतेदार व भटके विमुक्त समाजातील सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार असून राज्याच्या सामाजिक क्षेत्रात बदल होणार असल्याचे संकेत मिळाले..!
close