shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऐकावे ते नवलच... चिटकू लागली स्टील ची भांडी..!!

प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:

एरंडोल येथे कोरोनाच्या लसीचा डोस घेतल्यानंतर अंगाला लोखंड , स्टीलच्या वस्तू तसेच नाणी अंगाला चिटकत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी नाशिकमध्ये समोर आला होता . त्यानंतर आता एरंडोलमध्येही असाच प्रकार समोर आला आहे . एरंडोल येथील विद्यानगरातील रहीवासी पी.जी. पाटील यांनी आज शनीवारी ' अंगाला चिकटू लागली स्टीलची भांडी ही बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर पोहे खात असतांना त्यांनी स्टीलचा चमचा अंगाला लावला असता तो चिकटल्याचा त्यांना अनुभव आला . 


त्यानंतर त्यांनी १ रू . , ५ रू . व १० रूपयांची नाणी अंगाला चिकटवून पाहीली असता ती देखिल चिकटली हा अद्भूत प्रत्यय आल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार राहीला नाही .


विशेष हे की चिकटलेली नाणी / वस्तू खाली पडते की काय .. ? हे पाहण्यासाठी ते किचनमध्ये ईकडे - तिकडे चालत गेले , चालल्यावर सूद्धा वस्तू व नाणी खाली पडल्या नाहीत . कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर हा प्रकार आढळुन आला . कॉलनी परीसरात सध्या या विषयाबाबत कुतूहल पसरले आहे .

पी.जी. पाटील हे खडके खुर्द येथील महेंद्रसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात वरीष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत . ९मार्च २०२१ रोजी त्यांनी ' कोविशिल्ड , लसीचा पहीला डोस व ५ एप्रिल रोजी दुसरा डोस घेतला . त्यांची २१ वर्षे सेवा झालेली आहे . 

वस्तू चिकटण्याच्या या प्रकाराबाबत शासनाने दखल घ्यावी व त्यामागे वैद्यकीय कारण कोणते आहे .. ? या बाबत खुलासा होणे आवश्यक असल्याचे पि . जी . पाटील यांनी सांगितले . सध्या वस्तू चिकटण्याचा हा प्रकार वैद्यकीय दृष्ट्या औत्सुक्याचा विषय बनला आहे . हा चुंबकत्वाचा प्रकार तर नसावा ... ? नेमका प्रकार कश्याचा आहे असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत .
close